Mahatma Jotiba Fule Samaj Sevak

 महात्मा जोतिबा फुले (१८२७ ते १८९०)

  • जन्म : ११ एप्रिल १८२७, पुणे.
  • मूळ गाव : कटगुण (जि. सातारा)
  • मुळ आडनाव : गोरे  जोतिबा क्षत्रिय माळी समाजातील होते.

जोतिबांचे पूर्वज पुणे येथे फुलांचा व्यवसाय करत, त्यामुळे गोव्हे आडनाव मागे पडून ते फुले बनले.

• जोतिबांचे आजोबा : शेरीबा; पिता : गोविंदराव, माता : चिमणाबाई (जोतिबा १ वर्षाचे असताना मातोश्रींचे निधन)

१८४० : वयाच्या १३ व्या वर्षी धनकवडीच्या खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्रीबाईंशी विवाह.

१८४१ : उर्दू शिक्षक गफार बेग मुन्शी व धर्मोपदेशक लिजिट साहेब यांच्या प्रयत्नाने जोतिबांच्या शिक्षणास

पुन्हा सुरुवात. (पुण्यात स्कॉटिश मिशनरी शाळेत प्रवेश)

महात्मा फुले यांचे महिला उद्धाराचे कार्य :

अ) स्त्री शिक्षण : जोतिबांनी समाजकार्यास सुरुवात करताना सर्वप्रथम स्त्रीशिक्षणास प्राधान्य दिले.

१८४८ : पुण्यात बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू

३ जुलै १८५१ : बुधवार पेठेतील चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा सुरू.

१७ सप्टेंबर १८५१ : रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा सुरू.

१५ मार्च १८५२ : वेताळ पेठेत मुलींची आणखी एक शाळा सुरू.

मुलींसाठी शाळा सुरू करण्याच्या जोतिबांच्या कार्यामागे अहमदनगरच्या मिस फरार या बाईंनी मुलींसाठी सुरू केलेल्या शाळेची प्रेरणा होती.

स्त्रीशिक्षणाविषयी महत्त्व सांगताना 'जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी' असे फुले म्हणत.

• १६ नोव्हेंबर १८५२ : जोतिबांच्या शिक्षण कार्याची दखल घेऊन इंग्रज सरकारने पुण्यातील विश्रामबाग येथे

मेजर कॅन्डीच्या हस्ते त्यांचा सत्कार केला.

ब) विधवा पुनर्विवाह : १८६४ : पुण्यातील गोखल्यांच्या बागेत फुल्यांनी पहिला पुनर्विवाह घडवून आणला.

• १८६५ : विधवांच्या केशवपन बंदीसाठी प्रयत्न करताना तळेगाव-ढमढेरे येथे नाभिक बांधवांचा संप घडवून आणला.

क) बाल हत्याप्रतिबंधक गृहाची स्थापना, १८६३ : चुकून वाकडे पाऊल पडलेल्या विधवांची आपत्तीतून सुटका

करण्यासाठी जोतिबांनी स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले.

जोतिबांना अपत्य नव्हते. काशिबाई या विधवेच्या यशवंत या मुलास त्यांनी दत्तक घेतले.

महात्मा फुले यांचे अस्पृश्यतानिर्मूलन कार्य :

१९ व्या शतकात भारतात अस्पृश्यता निर्मुलन आंदोलनाची पायाभरणी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सर्वप्रथम केली.

महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी संपूर्ण समाज व्यवस्थेची पुनर्रचना करणे आवश्यक आहे हा

विचार सर्वप्रथम मांडला.

१८५१ : अस्पृश्यांच्या मुलांसाठी नाना पेठेत पहिली शाळा सुरू, ती बंद पडली.

१८५२ : अस्पृश्यांच्या मुलांसाठी वेताळ पेठेत शाळा सुरू केली.

१८५३ : पुण्यात 'महार, मांग इत्यादी अस्पृश्य लोकांस विद्या शिकविणारी मंडळी' ही संस्था स्थापन केली.

१८५८ : अस्पृश्यांच्या मुलांसाठी तिसरी शाळा सुरू.

महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्यास दक्षिणा प्राइझ फंडातून आर्थिक सहाय्य मिळाले.

१८६८ : स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.

१८७३ : म. फुले यांनी अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

१८७७ मध्ये 'दीनबंधू' या वृत्तपत्रातून सामाजिक रुढी-परंपरा तसेच अस्पृश्यांच्या परिवर्तनाचे विचार मांडले.


मित्रांनो ही माहिती  आवडली असेल तर तुमच्या जवळच्या मित्तरांना whats app वर share kara.

.

Post a Comment

0 Comments