स्वामी दयानंद सरस्वती व आर्य समाज ( swami Dayanand sarswati v arya samaj )
स्वामी दयानंद सरस्वती व आर्य समाज (१८२४-१८८३)
- जन्म : १२ फेब्रुवारी १८२४, टंकारा (गुजरात, काठेवाड), मूळ नाव : मूळशंकर करसनदास तिवारी
- १० एप्रिल १८७५ : मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. (मुख्यालय : दिल्ली)
- १८७७ : लाहोर येथे आर्य समाजाची शाखा स्थापन केली.
- स्वामी दयानंद सरस्वती यांचे ग्रंथ :१) सत्यार्थप्रकाश (१८७५), २) संस्कारविधी, ३) पंचमहायज्ञविधी, ४) गोकरुणानिधी
- 'सत्यार्थप्रकाश' हा सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यास साधणारा ग्रंथ संस्कृत व हिंदी भाषेत प्रकाशित.
- आर्य समाजाचे तत्त्वज्ञान : वेद हेच हिंदूंचे खरे धर्मग्रंथ आहेत.
- परमेश्वराच्या शुध्द स्वरूपाचे ज्ञान वेदात असून वेदाध्ययन हे प्रत्येक हिंदूमात्राचे कर्तव्य आहे.
- स्वामी दयानंदांनी आपल्या धर्माबांधवांना 'वेदांकडे परत चला' हा आदेश दिला.
0 Comments