Grampanchayat sampurn mahiti

 

ग्रामपंचायत


ग्रामपंचायत हा पंचायत राजचा ग्रामपातळीवरील, अथवा निम्न स्तरावरील वा तिसऱ्या पातळीवरील कार्यरत घटक आहे.

ग्रामपंचायत हा पंचायत राज संस्थांचा पाया आहे. ग्रामपंचायत ही ग्रामसभेची कार्यकारी समिती आहे.

स्थापना : मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ मधील कलम (५) नुसार आणि, भारतीय राज्यघटनेतील कलम (४०) नुसार.

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ राज्यात १ जून १९५९ पासून लागू झाला.

ग्रामपंचायतीची रचना : ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी संबंधित खेड्याची लोकसंख्या किमान ६०० असावी लागते.

६०० पेक्षा कमी लोकसंख्या असल्यास दोन-तीन खेड्यांची मिळून 'ग्रुप ग्रामपंचायत' बनते.

• डोंगरी भागात ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी गावची लोकसंख्या किमान ३०० असावी लागते.

सदस्यसंख्या : कमीत कमी (किमान) ७ व कमाल १७

गावच्या लोकसंख्येनुसार ग्रामपंचायत सदस्यांची संख्या पुढीलप्रमाणे -

गावाची लोकसंख्या                        सदस्य संख्या                                                

६०० ते १५००                               ७           

१५०१ ते ३०००                              ९ 

३००१ ते ४५००                             ११ 

४५०१ ते ६०००                           १३ 

६००१ ते ७५००                          १५ 

७५०१ हून अधिक                      १७ 

डोंगरी भागात ३०० ते १५०० लोकसंख्येसाठी : ७ सदस्य

ग्रामपंचायत सदस्यांना पंच असे संबोधतात. • पंचांची निवड ग्रामसभेमार्फत प्रत्यक्ष निवडणुकीने होते.

आरक्षण : ग्रामपंचायतीमध्ये खालील जागा राखीव ठेवल्या जातात.

• महिलांसाठी : एकूण सदस्यसंख्येच्या ५०% जागा राखीव.

अनुसूचित जाती-जमातींसाठी : संबंधित खेड्यातील एकूण लोकसंख्येशी असलेले अनुसूचित जाती-जमातींचे

प्रमाण लक्षात घेऊन त्यांच्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून काही जागा राखीव ठेवल्या जातात.

• नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी : एकूण सदस्य संख्येच्या २७% जागा राखीव.

• ग्रामपंचायतीचे वॉर्ड तहसिलदार घोषित करतात.

महत्त्वाचे : महिलांसाठी ५०% जागा राखीव असल्याने अनुसूचित जाती-जमाती व मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागांमध्येदेखील संबंधित प्रवर्गातील महिलांसाठी ५०% जागा राखीव ठेवल्या जातात.

ग्रामपंचायतीचा कार्यकाल : सर्वसाधारण स्थितीत ५ वर्षे (ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेपासून गणना)

राज्य शासन अपवादात्मक परिस्थितीत हा कार्यकाल एक किंवा सर्व ग्रामपंचायतींबाबतीत कमी-अधिक करू शकते.

• वाढीव कालावधी लक्षात घेता हा कार्यकाल साडेपाच वर्षांपेक्षा अधिक असू शकत नाही.

राम व्यवस्थापन (पंचायत राज) निवडणूक पद्धती : प्रत्यक्ष, प्रौढ व गुप्त मतदान पद्धती.

१८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीस मतदार गणले जाते, व त्यास मतदानाचा अधिकार प्राप्त होतो.

• उमेदवारी : ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवाराने वयाची २१ वर्षे पूर्ण केलेली असावीत.

महत्त्वाचे : दोनपेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्या उमेदवारांना आता ग्रामपंचायत (स्थानिक स्वराज्य संस्था)

निवडणूक लढविता येत नाही.

पदाधिकारी : सरपंच, उपसरपंच. • ग्रामपंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्यांना पंच असे म्हणतात.

पूर्वी पंच आपल्यापैकी एका सदस्याची सरपंच म्हणून व दुसऱ्याची उपसरपंच म्हणून निवड करत असत.

३ जुलै २०१७ च्या निर्णयानुसार सरपंचांची निवड आता प्रत्यक्षरित्या थेट जनतेतून केली जाते.

• म्हणजेच सरपंचांची निवड प्रत्यक्षरित्या जनतेतून, तर उपसरपंचांची निवड अप्रत्यक्षरित्या पंचांकडून होते.

Post a Comment

0 Comments